मुंबई | बंजारा समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी उद्या ऑल इंडिया बंजारा काॅन्फरन्स नरिमन पाॅईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर हरिभाऊ राठोड, संजय राठोड,पंकजा मुंडे, महादेव जानकर, राम शिंदे, माजी मंत्री मनोहर नाईक, प्रदीप नाईक, तुषार राठोड यांच्या प्रमुख उपस्थिती ही परिषद होणार आहे.