अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या मूलभूत गरजा …. आता मूलभूत गरजांची व्याख्या पुरती बदलून गेली, ती सुख-सोयींच्या, चैनीच्या साधनांनी घेतली. एखादं घर, घरातील आवश्यक वस्तू, त्याच्या बरोबर एखादी दुचाकी,चारचाकी वाहन!( गाडी). शहरात येणा-या माणसांची गंमत म्हणजे ते येतानाच “गाडी”,”बंगला” अशी स्वप्नं बाळगूनचं येतात.शहारात माणसांची जितकी
गर्दी त्याच्यापेक्षा अधिकपटीने,त्याच्या स्वप्नांची,इच्छांची, गरजांची गर्दी. या गर्दीच्या गाड्यांचे आज असे ट्रँफिक झालेय की, शहरातील जीवन सूसाट होऊन गेलं.अन् वाढू लागल्या सर्वाच्या स्वप्नांना पळवणार्या गाड्या ! लोकं “फास्ट लाफ” मध्ये जगताना इतके फास्ट होऊन बसलेत की, प्रवास करतानासुद्धा पूर्वीच्या साधनांचा वापर फारकमी करायला लागलेत. सर्वच अॉनलाईन पद्धतीने झटपट करण्यात ते व्यस्त झालेत . रेल्वे, हल्लीहल्ली तर रिक्षा, टँक्सीनेही प्रवास करायला लोकं कंटाळा करयला लागलेत.
असो! हल्लीचं धकाधकीचं जीवन लक्षात घेता लोक प्रवासातील दगदगीला कंटाळू लागलेत. नेहमीचेचं ते रेल्वेचे हाल, कधी मेगाब्लॉग, कधी अपघात… तर कधी अजूनकाही वेगळं! दुसरीकडे बसची गर्दी, सलग उभा राहून होणारा व नकोसा वाटणारा प्रवास… हे सर्व नेहमी सहन करताना लोकांच्या नाकीनऊ येतात. कधी अतिघाईच्या काळात लोकं रिक्षा , टँक्सीकडे धावले अन् इथे सुद्धा रिक्षा, टँक्सीचालकांनी मजुरी बरोबरच माजोरी वाढवली.कुणी उद्धट बोलतो तर कुणी सुट्टे पैशांसाठी वाद घालतो. एखादी वस्तू चुकून राहिली तर ती पुन्हा मिळनं अशक्यचं…. थोडक्यात लोकांच्या वेळेचा फायदा घेवून त्यांना लुबडण्याचा धंदा! इमर्रजन्सी”मधे लोकांनाजी ससेहोलपट करावी लागते किंवा लागली तेव्हा आता यांच्या मदतीला धावणारे म्हणजे ओला – उबेर! परवडणार्या दरात शिवाय डोर टु डोर सर्विस,सौजन्यशिलता, हवातसा आदरही मिळाला. पण बरोबरीला ट्रँफिकला हातभार लावणारे वाहतूकदारही मिळाले. ज्या रस्त्यांवर हजार गाड्या धावत होत्या तिकडे अधिक हजार गाड्या आल्या. प्रवासातल्या प्रत्येकानं ठरवलं, माझ्या गाडीने मी लवकर जाईन … यातून सारे सुखावले अन् सुस्तावले.
पाडवा,दसरा, दिवाळीला लोकांना गाडी घेण्यासाठी दिलेल्या आकर्षक अॉफर्स किंवा लकी ड्रॉ अॉफर्स ” यातून कंपन्यांच्या व्यवसायात भर पडतेय. परंतु दर दिवसाला वाढत्या वाहनांवर कशापद्धतीने समन्वय साधावा, हे तर्क कोणालाही समजले नाहीत. काही लोक असे की, त्यांनी कशाबशा तडजोडीतून स्वतःची गाडी घेतली आणि ती कंपनीला भाडेतत्वावर जोडली. लोक , लोकांचे मार्ग स्वतःच काढू लागलेत. येत्या काळात लोकांना त्यांची स्वप्नं फार महाग पडणार यात शंका नाही. कारण, शहारातील वाढत्या “ट्रँफिक” आणि “पार्किग” प्रश्न आत्ताच गंभीर आहे. तेव्हा लोकांचा प्रवास ? यातून झालेला वाहनांचा विकास …! हा प्रगतीचा की अधोगतीचा हे तुम्ही ठरवा.
– पूजा उबाले