मुंबई | बेस्ट उपक्रमास मुंबई महापालिकेने आर्थिक सहाय्य करण्यासह विविध मागण्यांचा प्रश्न रविवारी ६ ऑगस्टपर्यंत न सुटल्यास सोमवारी ७ ऑगस्टला ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी संपावर जाण्याचा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने घेतला आहे. तीन दिवसांपासून समितीच्या प्रमुख नेत्यांसह काही कार्यकर्ते उपोषणाला बसले होते.त्यातून गुरूवारी कर्मचा-यांच्या विनंतीनुसार उपोषण मागे घेतानाच संपाचा इशारा देण्यात आला आहे.