मुंबई | जनहिताचे अनेक सामाजिक उपक्रम करणाऱ्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने आज महारक्तदान शिबीराच आयोजन केल आहे. त्यात जमा झालेलं रक्त जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या कॅम्पला पाठवण्यात येणार आहे. सकाळी सहा वाजता सुरू झालेल हे शिबिर संध्याकाळी सहा वाजेपर्यत सुरु राहणार आहे. मंडळातील कार्येकर्ते आणि नौदलाच्या ४०० हून जवानांनी या शिबिरात रक्तदान केल आहे मुंबईतील रक्तदात्याचे हे रक्त संरक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते तातडीने एअर फोर्सच्या विमानाने जम्मू काश्मीरला पाठवले जाणार आहे.