मुंबई | संपूर्ण राज्यभरात चालू असलेल्या मराठा क्रांती मोर्चा आता थेट राजधानी मुंबईत धडकणार आहे. ९ ऑगस्ट रोजी जिजामाता उद्यान भायखळा ते आझाद मैदान, मुंबई याठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतप्त मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपल्या विविध मागण्यांसाठी आत्तापर्यंत ५८ मोर्चे काढले आहेत. मात्र अद्यापही या मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचे या मोर्चाकडे लक्ष असणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख मागण्या-
● कोपर्डी घटनेसह महिलांवर बलात्कार करणा-या नराधमांना तात्काळ फाशी द्या
● अॅट्रासिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये म्हणून कायद्यात बदल करा
● शेतक-याच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी द्या
● खर्चावर आधारीत कायद्याने हमीभाव मिळालाच पाहिजे
● अन्नासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ उच्चशिक्षण, प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी कार्यरत करा.
● अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाचे, गडकिल्ले विकासाची कामे त्वरीत सुरू करा.