मुंबई | अध्यक्ष महोदय, माझा तुमच्यावर विश्वास उरला नाही. आई तुळजाभवानीची शपथ घ्या. असे म्हणत आमदार प्रकारचे आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या प्रश्नांबाबत सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल प्रहार केला. अपंगांच्या शाळा, उत्पन्न मर्यादा आणि भत्त्याबाबत बच्चू कडू यांनी लक्षवेधी मांडली होते. अनुदान भत्ता वाढीचे १ हजार प्रस्ताव आलेत. त्यावर १ महिन्यात कार्यवाही करू असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंनी यावेळी दिले आहे. यापूर्वीही महिन्याचे आश्वासन दिले म्हणत बच्चू कडूंनी अध्यक्षांना शपथ घेण्याचा आग्रह धरला.