लखनऊ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २०२४ साली भारताचे पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी योगींचे वडील आनंदसिंग बिष्त यांनी केली आहे. नरेंद्र मोदीं नंतर पंतप्रधान होण्याची योग्यताही त्याच्यात आहे असे ते म्हणाले. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री झाल्यापासून त्यानी उत्तम कामे केली आणि अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांना जनतेचा आशीर्वाद मिळेल आणि ते २०२४ साली देशाचे पंतप्रधान होतील असे बिष्त यांनी भविष्यवाणी केली आहे.