मुंबई | एसटी महामंडळातर्फे नव्याने तयार करण्यात आलेल्या शिवशाही बसेसची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन मुंबई येथे पाहणी केली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती श्री. रामराजे निंबाळकर आणि मंत्री श्री. दिवाकर रावते उपस्थित होते. अशाप्रकारच्या 2000 बसेस लवकरच रस्त्यावर धावणार असून त्या संपूर्णत: वातानुकूलित, सुरक्षेसाठी सिटबेल्ट, आरामदायी आसन आणि एलसीडी स्क्रीन त्यात आहेत.