मुंबई | तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी अंबाजोगाई शहरामध्ये १४ आॅगस्ट २०१७ रोजी ( स्वातंत्र्याच्या पुर्व संध्येला ) मशाल घेऊन युवकांची स्वातंत्र्य ज्योत रॅली निघणार आहे , यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान , मुंबई च्या अंबाजोगाई केंद्राच्या वतीने नवमहाराष्ट्र युवा अभियाना अंतर्गत या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे . रॅली चे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता शहरातील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे . रॅलीची सुरुवात न.प. सभागृह येथून होणार आहे . बस स्टँड , मंगळवार पेठ , मंडी बाजार , योगेश्वरी मंदिर , गुरुवार पेठ , शिवाजी चौक मार्गे न.प. सभागृह येथे रॅली मार्गक्रमण करेल , त्या नंतर भारतीय संविधानाचा सरनामा वाचन व राष्ट्रगीताने समारोप होणार आहे , या रॅलीत शहरातील अनेक सामाजिक संघटना सहभागी , युवक , विद्यार्थी , महिला , प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी होणार आहेत.
तरी शहरातील युवकांनी रॅलीत सहभागी व्हावे , असे आवाहन डॉ. द्वारकादास लोहिया(अध्यक्ष) श्री.दगडू लोमटे (उपाध्यक्ष), डॉ. नरेंद्र काळे (सचिव), अमर हबीब, श्री. अभिजीत जोंधळे , श्री. मुजीब काझी सर , श्री.अनिकेत लोहिया , प्रा. मुकुंद राजपंखे , डॉ.महेंद्र जाधव , प्रा. भगवानराव शिंदे , श्री अभिजीत गाठाळ , श्री.वैजनाथ देशमुख , श्री.बी.के. मसने सर , श्री. धर्मराज सोळंके , अँड जयसिंग चव्हाण , अँड रामेश्वर ढेले , श्री. कैलास मंगे , श्री. विश्वास नरवडे , श्री. अनंत अरसुडे , श्री संतोष लोमटे , प्रा. प्रशांत जगताप , श्री. रणजीत मोरे , श्री. गोविंद टेकाळे , श्री. आशीष जाधव , श्री.केदार वाघमारे , श्री.मनोज इंगळे , अंकुर मोरे , कृष्णा सापते आदींनी केले आहे