मुंबई | बाॅलीवूडमध्ये वेगवेगळ्या प्रयोगासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता अर्थातच फरहान अख्तर आपला आगामी ‘लखनऊ सेंट्रल’ या सिनेमाचे गाणे पुण्यातील येरवडा जेल मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रदर्शित केले. अधिका-यानी परवानगी दिली तर हा चित्रपट कैद्यांना दाखवेल अशी इच्छा फरहान यांनी व्यक्त केली. ‘लखनऊ सेंट्रल’ सत्य कथेवर आधारित सिनेमा आहे असा फरहान याठिकाणी म्हणाला. रणजीत तिवारी हे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.