मुंबई | आपल्या अल्पशा कारकिर्दीत राजकारण आणि प्रशासनावर कणखर निर्णयाची ठाम मुद्रा उमटविणारा मुख्यमंत्री म्हणजे सुधाकरराव नाईक. यांच्या जयंतीचे औचित्य साधून वंसत विचारमालाच्या विद्यमानाने उद्या २० ऑगस्ट २०१७ रोजी शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे दुपारी ४ वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मश्री रामसिंग भानावत, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व जलक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना संयुक्त अभिवादन करण्यात येणार आहे. दरम्यान
महाराष्ट्रातील अंडरवर्ल्ड नष्ट करण्यासाठी सुधाकरराव नाईक यांचे योगदान या विषयावर व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड तर प्रमुख वक्ते म्हणून माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत पवार, आर्किटेक्ट मिलिंद पवार, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक तुळशीराम राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वसंत विचारमाला व आयोजन कमिटीने केले आहे.
संपर्क :
८१६९३८८११८
९८२२२२३५६९
८४२२०८७५०१