मुंबई | राज्यसेवा कर्मचारी, महानगरपालिका, नगरपालिका, राज्य शासनाच्या अख्तारितील मंडळे, महामंडळ, विद्यापीठ मधील पदोन्नतीला लागलेली रोख यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी भटके विमुक्ताचे नेते माजी खासदार तथा विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे २१ ऑगस्ट २०१७ रोजी संध्या ५:३० आरक्षण मंथन बैठक होणार आहे. याप्रसंगी विधीतज्ज्ञ अॅड. अमित कारंडे, डाॅ. हर्षदीप कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. मागासवर्गीयांच्या बढतीतील आरक्षण हे संविधानिक असून, यासंदर्भात कर्मचा-यांचा कुठलाही दोष नसतांना मोठे संकट कर्मचा-यांना सहन करावे लागत आहे. यासंदर्भात सर्व समाजबांधवानी लढा उभारण्यासाठी पुढे यावे असे आवाहन भटक्या विमुक्तांचे नेते हरिभाऊ राठोड यांनी केले आहे.