मुंबई | सिमोन दे बोआ या पाश्चिमात्य लेखिकेने म्हटले आहे. ‘वन इज नाॅट बाॅर्न रादर बिकस्म अ वूमन’ खरंच स्त्री आहे म्हणून विश्व आहे. पण अगदी देवालाही न सुटलेला प्रश्न म्हणजे बाई. स्त्रियांच्या मनात काय चाललंय आजवर कुणीही ओळखू शकला नाही. पण याचा अनुभव प्रत्येक पुरुषाला असेल. त्यामुळे पत्नी कधीही न सुटणार कोडं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पत्नीचे ११ प्रकार व्व्हायरल होत आहेत. चला, जाणून घेवूयात कोणते आहेत हे प्रकार
१)आळशी बायको- स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा. प्रत्येकाला असं वाटतं की आपली बायको ही आळशी आहे.
२)धमकवणारी बायको- कान खोलून ऐकून घ्या, या घरात मी राहीन किंवा तुमची आई राहील.
३)इतिहासाची आवड असलेली बायको- सर्व जाणून आहे मी, तुमचं खानदान कसं आहे ते.
४)भविष्य-वाचक बायको- पुढल्या सात जन्मांपर्यंत माझ्या सारखी बायको मिळणे शक्य नाही.
५)टिकाऊ बायको- मी होते म्हणून टिकले, दूसरी कोणी असती तर आतापर्यंत पळून गेली असती. यातून तुमची कोणती आहे? तपासून घ्या!
६)शंकाळू बायको- फोनवर कोणाशी बोलत होता इतक्या वेळेपासून?
७)धार्मिक बायको- देवाचे आभार माना जी माझ्यासारखी बायको पदरात पडली.
८)निराश बायको- माझ्या नशीबात हेच फुटकं भांड लिहिलेलं होतं का?
९)अर्थशास्त्रज्ञ बायको- कोणता खजिना जमा केलेला आहे जे रोज-रोज चिकन खाऊ घालू?
१०)गोंधळलेली बायको- तूम्ही माणूस आहात की पायजमा?
११)स्वार्थी बायको- ही माझी साडी माझ्या आईने माझ्यासाठी दिली आहे. तुमच्या बहिणांना मटकवण्यासाठी नाही.