ठाणे | ठाणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या आणि कळवा परिसरात राहणाऱ्या महिला पोलीस काँस्टेबलने फास घेवून आत्महत्या केले आहे. बुधवारी दुपारी घडली असून सारिका पवार असे आत्महत्या केलेल्या त्या महिला काँस्टेबलचे नाव आहे. सारिका ही मूळची अहमदनगरची रहिवासी आहे. ती ठाणे पोलीस मुख्यालयात कार्यरत होती, कळवा येथील मनीषा नगरात राहत होती. महिला पोलीस काँस्टेबलने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सारिका बुधवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी रुममध्ये एकटी असताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सारिकाने आत्महत्या का केली? याचा अद्याप उलगडा झालेला नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. बागवान यांनी दिली आहे.