मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विदेशात शिक्षणासाठी स्वतःच्याच मुलीला शासकीय शिष्यवृत्ती दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे बडोले मोठया अडचणीत येण्याची शक्यता आहे. श्रुती बडोले असे त्यांच्या मुलीचे नाव आहे. आपल्या मुलीला राज्य सरकारकडून इंग्लंडच्या मँचेस्टर विद्यापीठामध्ये “अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रॉफीजिक्स” या विषयात पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. यासंदर्भात कुठलेही निकष न लावता ही शिष्यवृती देण्यात आली आहे. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.