मुंबई | समाजाला एका साखळीत जोडणारं माध्यम अर्थातच व्हाॅट्सअॅप. मात्र आता व्हाॅट्सअॅप वापरासाठी पैसे द्यावे लागणार आहे. मोठ्या कंपन्या तसेच संस्थांना व्हॉट्सअॅप बिझनेस फिचर देणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. व्हॉट्सअॅपनेही आता या बातमीला समर्थन दिले आहे. पैसे भरुन कंपन्या किंवा संस्थांना व्हेरिफाईड अकाऊंट घेता येणार आहे. ज्याद्वारे ते आपल्या ग्राहकांशी संपर्क साधू शकतात. व्हॉट्सअॅपच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मॅड इडेमा यांनी “वॉल स्ट्रीट जर्नल” ला दिलेल्या मुलाखतीत व्हॉट्सअॅपच्या व्यावसायिक वापरण्याच्या संदर्भात माहिती दिली आहे.