मुंबई |काँग्रेसचे युवानेते मिलिंद देवरा यांनी ज्या पक्षांच्या नावात सेना किंवा फौज आहे. अशा पक्षांची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे. गौरी लंकेश यांनी उजव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाविरोधात आवाज उठवला. त्यामुळेच त्यांची हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात शिवसेना, हिंदूराष्ट्र सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर कर्नाटकात श्रीराम सेना नावाचे पक्ष संघटना आहेत.