पुणे | ‘भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी’ या राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहजी यांच्या पुस्तकाचे आज पुणे येथे विमोचन करण्यात आले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरजी, विनय सहस्त्रबुध्देजी उपस्थित होते. आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ” हे केवळ पुस्तक नाही तर एक विचार मंथन आहे. कार्यकर्ते आणि समाजाच्या अनेक क्षेत्रातील व्यक्तींशी झालेल्या संवादातून हे मंथन पुढे आले आहे. यातून प्रश्नांना उत्तरेही मिळतील आणि कार्यकर्त्यांना प्रेरणाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांविषयी यावेळी मनोगत व्यक्त केले. व्हॅटच्या तुलनेत आज जीएसटी भरणाऱ्यांच्या संख्येत जवळजवळ 3.5 पटीने वाढ झाली आहे. आयकर भरणाऱ्यांची संख्या दुपटीवर गेली आहे. आम्ही या पक्षात काम करतो, जो पक्ष सांगतो की, माणूस जन्माने नाही, तर कर्माने श्रेष्ठ होतो. पंडीत दीनदयालजी उपाध्याय यांनी जो एकात्म मानवतावाद सांगितला, ते आमच्या कामाचे सूत्र आहे. आज गिव्ह इट अप, स्वच्छ भारत या सारख्या अभियानातून सामान्य माणसाचा सरकारमधील सहभाग वाढला आहे. जगात भारताचा दबदबा निर्माण झाला आहे. काळ्या पैशावर पायबंद, स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासन यातून नवभारताच्या निर्मीतीकडे आपली वाटचाल वेगाने होते आहे. मला खात्री आहे की या पुस्तकातून ‘संकल्प से सिध्दी’ अभियानात अनेक सैनिक जोडले जातील.”