मुंबई | राष्ट्रवादी पक्षाने शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षाचा इशारा दिला. पण, सरकारने मात्र १ ते २ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्जाची मुदत संपत असली तरी घाबरू नका शेतकऱ्यांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी भासतात, त्यांच्यासाठी तक्रार निवारण केंद्र सुरु केलं जाईल. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार असं पाटील यांनी स्पष्ट केले.