मुंबई | बंजारा समाजाच्या जीवनप्रवाहात प्रारंभ आणि शेवटही जीथे होतो,ते म्हणजे तांडा वंचित असेल,अनेक समस्याने वेढावलेला असेल,अनेक शोषकानी, प्रस्थापित व्यवस्थेनी रक्त शोषल्याने दुर्बल असेल आणि त्याच्याच बाहुपाशात राहुन पंख फुटताच भरारी घेऊन पुन्हा कधी त्याच्याकडे न परतल्यामुळे विवंचनेत असेल, उद्वीग्न होऊन मेट्रोसिटीतील या गोरपाखराना कधी शिव्याही देणारा असेल. परंतु तो तांडा जन्मदात्याप्रमाणेच प्रिय आहे. आदी आणि अंत ते पवित्र स्थळ म्हणजे तांडा. त्यामुळे या तांड्याच्या पुनर्रूत्थानासाठी एक संरचनात्मक आणि विधायक अशा विचारप्रवाहाची काळाची गरज होती. निसर्गत: ते विचारप्रवाह पुरोगामी महाराष्ट्रात जन्मास आले. तांडेसामू चालो हे या विचारप्रवाहाचं काळजातलं नाव.बंजारा समाजाच्या इतिहासातली एक प्रेरणादीप ठरणारी अशी ही वंचिताभिमुख संकल्पना.एकनाथ पवार हे एक निव्वळ माध्यम आहे. खर्याअर्थाने तांड्याच्या पुनर्रूत्थानासाठी निसर्गानेच आणलेली आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधीनी या देशात रुजवलेला खेड्याकडे चला हा विचारप्रवाह आजही शाश्वत आहे.परंतु यामध्ये माझ्या वंचिताचा तांडा मात्र कुठेच नव्हता.राहिल तरी कसा..?प्रवाहबाहेर फेकलेल्या तांड्याचा विचार नाही व्यवस्थेनी केला, अन् नाही तांड्यातुन मोठे झालेल्यानी केला होता.म्हणुनच तांडेसामू चालो या संकल्पनेचा उदय झाला.परंतु प्रत्यक्षात मार्गक्रमन करायला बराच अवधी जरी लागला तरी,एक आकृतीबंध,सर्वव्यापी आणि सर्वंकष कृतीकार्यक्रम म्हणुन तांडेसामू चालो अभियान यारुपाने तांड्याच्या साक्षीने १४ सप्टेबंर रोजी माहुरखोरा या तांड्यातुन प्रारंभ करण्यात आला.
कृतीकार्यक्रम : प्रत्यक्ष तांडासंवाद कृतीआराखडा
●मुलभुत समस्याला हात
●वसंतविचारधारा चा प्रसार
●नव्या विचाराचे अवलोकन
●तांडा गोर संस्कृती संवर्धन
●व्यसनमूक्ती,हुंडामूक्ती जागर
●शासकिय पाठपुरावा
●तांडा सबलीकरण आणि
●वैचारिक समृद्घी
अशा विविध महत्वपुर्ण सह उपक्रम घेउन फक्त तांडा आणि तांड्याचा पुनर्रुत्थान हेच लक्ष्य ठेवुन एक सामाजीक बांधिलकी म्हणून हे अभियान राज्यभर दैनिक सकाळ च्या आणि समाजहितचिंतकाच्या सहयोगाने पुढे जात आहे. समाजातील सामाजीक बांधिलकी जोपासणार्या अनेक मंडळीचा,सामाजीक कार्यकर्त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहयोग या अभियानाला लाभत आहे.विशेषत्वाने विदर्भातील नामांकित पत्रकार प्रमोदजी काळबांडे(सह.संपादक दैनीक सकाळ) यासह तांडादूत याबरोबरच या संकल्पनेला निष्ठापुर्वक जनमाणसात पोहचवणारे सर्व तांडाप्रेमी यांची महत्वपुर्ण भुमिका या अभियानाला लाभत आहे. तांडेसामू चालो ही संकल्पना अर्थातच हे अभियान जेवढ्या गतीने पुढे जाईल ,त्याच गतीने तांडा पुढे जाऊ शकतो. अभियानातच खर्याअर्थाने न्यायवंचित तांड्याचा उज्वल भविष्य आहे.कारण तशी मांडणीच या अभियानाची आहे. हे अभियान फक्त तांड्याच्या पुनर्रूत्थानासाठी असुन कोणत्याही संघटन,किंवा पक्षाचा नाही तसेच कोणत्याही लादलेल्या विचारधारेचा नाही.स्वतंत्र आणि सर्वंकष विचारधारा आहे,ज्यात तांडा केंद्रक आहे. ग्लोबलतेमध्ये तांडा आणि गोरसंस्कृती सर्वव्यापी व्हावी या दृष्टीने वाटचाल. हा अभियान आपल्याही हक्काचा.. ज्याला निस्वार्थतेनी तांड्याच्या पुनर्रूत्थानासाठी काम करायचे असेल. त्यांचा हा जन्मसिद्घ अभियान. येथे लहान मोठा कोणी नाही.सर्वाना समान अधिकार आणि मानसन्मान. फक्त तांड्यात सकारात्मकतेनी येण्याची तयारी असावी. कृतीकार्यक्रमात निस्पक्षतेनी सकारात्मक भुमिका घेण्याची मानसिकता हवी. जन्माचा श्वास हे तांडेसामू चालो संकल्पनेचं वारकरी .याचाअर्थ मृत्युनंतर ही संकल्पना कालवश होणार नसुन पुनर्रज्यीवीत होणारी हि शाश्वत आणि निरंतर अशी ऐतिहासिक संकल्पना होय. तांड्याच्या पुनर्रूत्थानासाठी आपलाही सहयोग असावा,असं वाटत असेल तर या अभियानात सहभागी व्हावे, आणि ही काळाची गरज आहे.
या अभियानात सहभागी होऊन तांड्याच्या पुनर्रुत्थानासाठी पुढे यावे. १७ सप्टेबंर रोजी नागपूर येथे वर्धापन दिनाच्या औचित्याने तांडामंथन आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ‘ताडेसामू चालो’चे मुख्य प्रवर्तक एकनाथ पवार यांनी केले आहे.