रायगड | पोलादपुर तालूक्यातील चिखली हे फक्त एकमेव गाव अाहे जिथे आजवर रस्ता अाणि गाडीपूल नाही. रोज गावातील शाळेतील लहान मुलांना स्त्रियांना गावकरी लोकांना गेली अनेक वर्षे जीव मूठीत घेऊन जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. गेली १५ वर्षे सरपंच,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य,आमदार,खासदार सर्वांना लेखी निवेदन देऊन आणि अनेकदा पाठपुरावा करून देखील आजवर गावाला रस्ता नाही. नदीवर गाडीपुल नाही ४ घरे असलेल्या तालुक्यातील गावांचा रस्ता झाला मात्र आजवर चिखली गावाचा वापर फक्त मतदान मागण्यापूरता होत असल्याचे खंत गावक-यांनी केले. निष्पाप लोकांचा जीव गेल्यावर सरकार रस्ता अाणि पुल बनवणार का असा परखड सवालही ग्रामस्थांनी केला आहे.