मोहाली | पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकार के. जे. सिंग यांची आणि त्यांच्या मातोश्रींची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहालीतील फेज ३ बी २ येथे हा प्रकार घडला. के. जे. सिंग आणि त्यांच्या मातोश्रींच्या गळ्यावर वार करण्यात आलेत. तसेच त्यांच्या घरातील मौल्यवान दागिने आणि कारदेखील गायब आहे. यासंदर्भात, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबिंदसिंग बादल यांनी या घटनेचा निषेध केला असून याप्रकरणी विशेष तपास पथक नेमणार असल्याचं सांगितलं आहे.