मुंबई | काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या राहत्या घरी गळफास लावून शेलार यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात शोक पसरले आहे.
शेलार यांनी गळफास घेतल्यानंतर त्यांना लगेच मुलुंड येथील फोर्टीस हाॅस्पीटलमध्ये नेल्यात आले. मात्र ते मृत असल्याचे डाॅक्टरानी सांगितलं. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळाले नाही.