मुंबई | दीपक सरोदे दिग्दर्शित ‘धुआ’ या हिंदी लघुचित्रपटाने साता- समुद्राच्या पलिकडे मराठी पताका रोवले आहे. गोल्डन गेट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या लघुपटाची निवड करण्यात आली आहे. भारतातील लघु चित्रपटातून ‘धुआ’ ह्या एकमात्र चित्रपटाची निवड या चित्रपट महोत्सवात करण्यात आली आहे. अमेरिकेतील सॅन जोस, कॅलिफोर्निया याठिकाणी २९ ऑक्टोबर २०१७ ला होणा-या चित्रपट महोत्सवात ‘धुआ’ स्क्रीनिंग होणार आहे. या चित्रपटाचे कथा- पटकथा- संवाद आणि दिग्दर्शन दीपक सरोदे यांनी केलंय. डिओपी भगवान गगे तर एडिट हर्षल आसवानी यानी केलंय. संगीत संदेश हाटे यांनी दिले आहे. मुख्य कलाकाराची भूमिका महेश फाळके, अनिश शिर्के, शुभांगी सरोदे तर सहकलाकार मिलिंद भाटे, कमलेश कांबळे, अवधूत देशमुख, पुठ्ठा शेट्टी, सुरज विसपुते यांनी साकार केल्या आहेत.