मुंबई | दक्षिण भारतात असलेल्या देवभुमीत म्हणजेच करेळ मध्ये संघ व अभाविप कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या हत्येविरोधात अभाविपने देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. आणि त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून अभाविपचे संपूर्ण देशभरातील कार्यकर्ते ११ नोव्हेंबर २०१७ रोजी केरळ मधील तिरूअनंतपुरम येथे हे आंदोलन घेऊन जाणार आहेत. या मध्ये मुंबई मधील सुद्धा अभाविपचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
‘चलो केरळ हि एक देशव्यापी चळवळ आहे विस्मृतीत गेलेल्या आत्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि केरळ मधील कित्येक हुतात्म्यांनी देशासाठी केलेल्या बलिदानाबद्दल संपूर्ण देशाला कळवण्यासाठी. हि एक चळवळ आहे उठून, जागे होऊन CPM च्या हत्याकांडला रोखण्यासाठी. १९६५ साली कन्नूर यथे १६ वर्षाच्या सुब्रहमण्यमच्या हत्येपासून या सर्वाची सुरुवात झाली. एकूण २७० राष्ट्रवादी विचारांच्या लोकांची हत्या आतापर्यंत केरळ मध्ये झाली आहे. आणि या सर्व हत्याकांडामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे. त्यामुळे राजकीय मदतीने हत्या झालेल्या आत्म्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच केरळ मध्ये अभिव्यक्ती व भाषण स्वातंत्र्याचा आवाज उंचावण्यासाठी अभाविपने चलो केरळ हे अभियान ठरवले आहे’ असे अभाविपचे कोंकण प्रदेश मंत्री प्रमोद कराड यांनी सांगितले.
या हत्याकांडाचा निषेध म्हणून संपूर्ण देशभरात निदर्शने झाली आहेत. मुंबई मध्ये सुद्धा पाच ठिकाणी पत्रक वाटप, भाषण, घोषणा या प्रकारे सर्वसामान्य लोकांपर्यंत केरळ मधील हिंसाचाराचा विषय अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पोहोचविला आहे. तसेच अभाविपने मुंबई मधील मरीन लाईन्स ते चर्चगेट पर्यंत जनसंदेश यात्रा काढली आणि सोबत पत्रक वितरण व भाषणाद्वारे सामन्यांपर्यंत चलो केरळ हा विषय पोहचविला’ असे अभाविप मुंबईचे मंत्री रवी जयस्वाल यांनी सांगितले.