हल्ली एखाद्या टिनेज मुलाने एखाद्या मुलीला प्रपाेज केल्यावर त्या गाेष्टीच फार माेठ भांडवल आपला समाज करताे.( प्रपाेज नाकारल्यावर याची शक्यता जास्त असते.) मुलगा बिघडला, वाया गेला, जवानी चढली, लाेफर झाला,हा प्रसिद्ध शब्द. घरच्यांनी संस्कार चांगले दिले नाही, वाईट संगतीत लागला अशा प्रकारे आणि अजूनही ब~याचशा प्रतिक्रिया त्या मुलाच्या बाबतीत आपल्या समाजातून येत असतात. एका अर्थाने समाजासाठी ताे मुलगा शक्ति कपूर झालेला असताे. पण खरच हे प्रकरण एवढ गंभीर असत का?
निसर्गाने मानवाच्या शरीराची रचनाच तशी केली आहे. वयानुसार माणसाच्या शरीरात आणि मनात बदल हाेणारच.ते सगळ नैसर्गिक आहे. त्याला काेणीच राेखू शकत नाही. त्याच ते प्रेम निरागस पण असू शकतं. आणि नूकत्याच तारुण्यात पदार्पण करणा-या मुलाला चांगल्या, वाईटाची जाणीव तरी कुठे असते हाे. त्याला ती जाणीव करून देण्याची जवाबदारी आपल्या समाजाची आहे. पण आपला समाजच तेवढा समजूतदार झाला नाही आहे. उलट हा विषय त्यांच्यासाठी चघळण्याचा आणि मनोरंजनाचा बनून जाताे. आपला समाज हा त्या टिनेज मुलाचं अशाप्रकारे खच्चीकरण करताे की, त्या बिच्या-याला पण वाटत की आपण खूपच माेठ पाप / गून्हा केला आहे. समाज हा त्याच्या कडे अत्यंत विकृत नजरेन पाहताे, त्याच्या पासून त्याचे जीवाभावाचे मित्र हिरावून घेताे. शेवटी त्याच्या वाट्याला देत एकटेपणाच आणि निराशेच जगणं. त्यातूनच कधी कधी घडते आत्महत्या. अडचणी च्या वेळी त्याला सांभाळणार, या विषयावर सगळ समजावून सांगणार काेणीतरी त्याला हव असत. कारण ते वयच तस असत. चंचेलतेच, कुतूहलाच आणी गाेंधळात टाकणार. या वयात त्याच्यावर जे चांगले वाईट परिणाम पडतात ते कायमचे राहून जातात या वयात त्याला गरज असते योग्य मार्गदर्शनाची. पण आपल्या समाजात या विषयावर माेकळेपणाने बाेलल्या जात नाही. कारण आपला समाज या सगळ्या गाेष्टी त्याला माेकळेपणाने समजावून सांगण्याईतका प्रगल्भ झाला नाही. आणि दूर्भाग्यानं आपली शिक्षणव्यवस्था पण तशी नाही आहे. तेव्हा गरज आहे समाजाच्या समजदार हाेण्याची आणी टिनेज तारूण्य वाचवण्याची कारण आपल्या समाजात वावरणा-या प्रत्येक परश्याला आर्चीच मिळेल याची हमी नाही ना !
– प्रवीण खरोडे