यवतमाळ | आजकाल वाचन संस्कृती कमी झाली आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी वाचन आवश्यक असून त्याला दुसरा कोणताच पर्याय नाही. ग्रंथ आणि पुस्तक हे ज्ञान संपादनाचे सर्वात मोठे साधन आहे. तसेच वाचन हा माहिती देण्याचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. वाचन संस्कृतीकडे तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून तसेच नियोजन समितीच्या निधीतून ‘गाव तेथे वाचनालय’ ही संकल्पना राबविण्यात येईल.
‘यवतमाळ ग्रंथोत्सव’ या व्यासंगी कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावर यांनी ‘गाव तेथे वाचनालय’ ही संकल्पना राबविण्यात येईल अशी घोषणा केली.