मुंबई | धुळ्यातील निकुंभे येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली आणि त्यांच्याशी शालेय शिक्षणाबरोबरच विविध विषयांवर संवाद साधला.
धुळे जिल्ह्यात लोकसहभागातून डिजिटल क्लासरुम सुरु झाले आहे आणि याच पार्श्वभूमीवर धुळ्याच्या निकुंभे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरुमचा कसा फायदा होतो हे शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी यावेळी जाणून घेतले.