मुंबई | दहशतवादाविरूद्ध लढाईत सामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक असून प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून सुरक्षा दलांसाठी डोळे व कान बनून काम केल्यास देशाच्या सुरक्षेला कधीच धोका पोहचणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच आणि बॅाम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २६/११ हल्यातील शहीदांना मानवंदना देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.