मुंबई | भारतीय संविधानाने सर्व जाती, सर्व धर्म, सर्व पंथाच्या लोकांना एकसूत्रात बांधण्याचे काम केले आहे. आज लोकशाही प्रगल्भ होत आहे ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच. त्यामुळे या संविधानाची मूल्ये सगळ्यांनी जपावी, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी आज चैत्यभूमी, दादर येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आयोजित ‘संविधान दौड आणि गौरव यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.