मुंबई | राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार असून या प्रकल्पाअंतर्गत चक्री वादळ पूर्व सूचना कार्यप्रणाली यंत्रणा उभारण्यात येणार आहे. याविषयी आज किनारी भागात आपत्ती निवारणाचे काम करणाऱ्या यंत्रणांची परिषद झाली.
मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेस आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक राजीव निवतकर, आसामचे आपत्ती निवारण विभागाचे तज्ञ व्ही. एन. मिश्रा, गुजरात आपत्ती निवारण कक्षाचे श्री. सरपोतदार, टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट ऑफ इंडिया कंपनीच्या महाव्यवस्थापक शिवांगी सिन्हा आदी यावेळी उपस्थित होते.