मुंबई | ‘उडान’ या योजनेत समाविष्ट असलेल्या नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंग जी विमानतळावरुन नांदेड-मुंबई-नांदेड अशी विमानसेवा सुरु झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी तसेच सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.
नांदेड येथील विमानतळावरुन ‘ट्रु जेट’ या विमान कंपनीकडून दररोज नांदेड-मुंबई-नांदेड अशी एटीआर-७२ विमानाद्वारे विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या ७२ आसनी विमानातील सुमारे ७५ टक्के जागा भरण्यात आल्या होत्या.