मुंबई | दहावी आणि बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असते. या परीक्षेचे गांभिर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ११ वाजताच्या पेपरसाठी अर्धा तास अगोदर परीक्षावर्गात येणे अपेक्षित आहे. या अर्ध्या तासात परीक्षागृहात विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट तपासणे, प्रश्नपत्रिका देणे असे करणे शक्य होणार आहे.
विद्यार्थ्यांवरील परीक्षेपूर्वी ताण कमी करुन अर्धा तास अगोदर वर्गात सोडून बरोबर ११ वाजता परीक्षा सुरु करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितालाच प्राधान्य देण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.