मुंबई | वर्सोवा बीच येथे अफरोज शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत आज मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. समुद्र आणि समुद्रकिनाऱ्याची सर्वांगीण स्वच्छता आणि संवर्धन यासंदर्भातील धोरण तयार करण्याबाबत अफरोज शाह हे काम करीत आहेत. या धोरणाचा मसुदा ते लवकरच राज्य शासनाला देणार असून त्यावर अजून संशोधन करुन राज्य शासन हे धोरण निश्चित करेल, असे मुख्यमंत्र्यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.
वर्सोवा बीच येथे स्वच्छतेसाठी अफरोज शाह यांनी हाती घेतलेले काम खूप मोठे आहे. काही कारणास्तव बंद पडलेली मोहीम अफरोज यांनी पुन्हा सुरु केली असून शासन पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या उपक्रमात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती.