मुंबई | महाराष्ट्र पोलीस दलाच्या नक्षलवाद विरोधी सी-६० पथकाने सात नक्षलवाद्यांविरूद्ध केलेल्या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि सी-६० पथकाचे दूरध्वनीद्वारे विशेष अभिनंदन केले आहे.
मारले गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये सिरोंचा एलओएस कमांडर चंदू आणि अहेरी एलओएस कमांडर आकाश मंगा पेंडाम, वय ३८ वर्षे (बक्षिसाची रक्कम प्रत्येकी आठ लाख रूपये), प्लाटून १४ मेंबर पीपीसीएम महारी दल्लू आत्राम, वय २३ वर्षे (बक्षिसाची रक्कम चार लाख रूपये), सिरोंचा एलओएस एसीएम फुलाबाई मुत्ता कोडापे, वय २३ वर्षे, (बक्षिसाची रक्कम सहा लाख रूपये), पेरमिली एलओएस मेंबर पीएम सब्बी गुड्डी कोवासे, वय १८ वर्षे, (बक्षिसाची रक्कम तीन लाख रूपये), प्लाटून १४ पीपीसीएम सुनिता नारोटे, वय २६ वर्षे (बक्षिसाची रक्कम चार लाख रूपये) यांच्यासह अन्य एकाचा समावेश आहे.