मुंबई | मुंबई महापालिकेच्या ॲप आणि संकेतस्थळामुळे नागरिकांसाठीच्या महत्त्वपूर्ण अशा सेवा कार्यक्षम आणि पारदर्शकपणे उपलब्ध होणार आहेत. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे अद्ययावत तंत्रज्ञानाचा सेवा क्षेत्रात वापर करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न अभिनंदनीय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या MCGM 24 x 7 या मोबाईल ॲपचा तसेच आणि One MCGM GIS या संकेतस्थळाचा सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.