अमरावती | विद्यार्थिनींवर होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली आहे. तरुणीवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही, अन्यथा रस्त्यावर उतरण्याची भूमिका परिषदनेे घेतली आहे.
विभागीय पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन अमरावती शहरात विद्यार्थिनींवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले.