पोहरादेवी | सामाजिक कार्यकर्त्या तथा तेजस्विनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा आश्विनी रवींद्र राठोड यांना बंजारा समाज गौरव पुरस्कार देण्यात आला. सोलापूरच्या आश्विनी राठोड गेल्या अनेक वर्षांपासून समाजात जनजागृती करण्याचे काम करत आहेत.
५ डिसेंबर बंजारा गौरव दिवसाचे औचित्य साधून या पुरस्काराने राठोड यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार तथा आमदार हरिभाऊ राठोड, माजी मंत्री मनोहरराव नाईक, माजी आमदार किसनराव राठोड, माजी आमदार अनंतकुमार पाटील, उद्योगपती किसन राठोड, प्रा. फुलसिंग जाधव, प्रा. मोतीराज राठोड, युवा साहित्यिक एकनाथ पवार, ज्येष्ठ पत्रकार शंकर आडे उपस्थित होते.