औरंगाबाद | राज्याच्या गतिमान विकासासाठी उत्कृष्ट मानवसंसाधनाची व्यापक उपलब्धता हा घटक महत्वाचा आहे. त्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात कौशल्यपूर्ण प्रशिक्षित मानवसंसाधनाच्या निर्मितीसाठी शासन प्रयत्नशील असून येत्या दोन वर्षात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील तसेच औरंगाबाद येथे लवकरच स्कूल ऑफ आर्किटेक्चर सुरू करण्यात येईल.
अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. औरंगाबाद येथील कांचनवाडी येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.