मुंबई | देशातील १२ कोटी बंजारा समाजाचे आराध्यदैवत असलेल्या सतगुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंती दिनी अर्थातच १५ फेब्रुवारीला महाराष्ट्र शासनाने सुट्टी जाहीर करावे असे निवेदन राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने मुख्यमंत्री देेेेवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
याप्रसंगी मुंबई प्रदेश अध्यक्ष राजेश चव्हाण, सुरेश राठोड, कविराज पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. “समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात शासनाने पुढाकार घेवून १५ फेब्रुवारीला संत सेवालाल जयंती निमित्त शासनस्तरावर सुट्टी घोषित करण्यात यावे.” असे राजेश चव्हाण यावेळी म्हणाले.