माहूरगड | बंजारा तथा तत्सम न्यायवंचित तांड्याच्या समग्र पुनर्रुत्थानासाठी सर्वसमावेशकतेने सकारात्मक बदल घडवून आणणारा एक लोकोत्तर अभियान म्हणून तांडेसामू चालो अर्थात तांड्याकडे चला अभियानाची देशभर ओळख निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनाच्या औचित्याने श्रीश्रेत्र माहुरगड येथून मराठवाडा विभागात तांडेसामू चालो अभियानास प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी कामगार आयुक्त दिलीप पवार, माजी पं.स. सभापती शरदभाऊ राठोड , ज्येष्ठ बंजारा नेते पी.डी.चव्हाण,माजी पं.स.सदस्य कीशनजी राठोड, अॅड.चेतन राठोड, माहूर कृउबा समिती सदस्य किशोर राठोड, तांडेसामू चालो अभियानाचे नांदेड जिल्हा समन्वयक सुमितभाऊ राठोड,सरपंच राजू राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. माहुर तालुका तथा परिसरातील न्यायवंचित तांड्याचा पुनर्रुत्थान तसेसतांड्यातील विविध प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली. कामगार आयुक्त दिलीप पवार व सुमितभाऊ राठोड यांनी तांडेसामू चालो अभियानाची आजच्या काळात व पुढे येणार्या काळासाठी नितांत गरज असल्याचे मत आपल्या भाषणातून व्यक्त केले.
सुमीत राठोड यांनी तांड्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकदिलाने पुढे येण्याचे आवाहन केले.यावेळी माहुर संत सेवालाल महाराजाचे मंदिर माहुर येथे बांधण्याचे सर्वानुमते ठरवीण्यात आले. नांदेड जिल्हयात तांडेसामू चालो अभियानाच्या कृतीकार्यक्रमामधून तांडा अभ्यासिका देखिल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रा.धरमसिंग जाधव यांनी दिली.
अभियानाच्या तांडामंथनास नायक पांडूरंग राठोड, कारभारी विष्णू पवार,पोलीस बंडू जाधव,काॅ.किशोर राठोड, संदीप राठोड, सरपंच राजू राठोड,मनिष राठोड,अनिल जाधव, किशोर राठोड, प्रमोद राठोड, सचिन राठोड, गणेश जाधव, मोहन नाईक, किशोर राठोड, अमर जाधव, सतिश पवार, गोपाल चव्हाण यासह मोठ्यासंख्येने समाज बांधव उपस्थित होते.