नागपूर | विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळी प्रथम सभापती श्री. नाईक निंबाळकर यांच्या दालनात जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष बागडे यांचे स्वागत केले. यावेळी संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते.