नागपूर | छायाचित्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेसह विविध लोककल्याणकारी योजनांचे प्रतिबिंब असलेले ‘महाराष्ट्र माझा’ हे राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन नागपूर येथील शासकीय मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे आयोजित करण्यात आले आहे.
या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व विकासात्मक परिवर्तनाची बोलकी छायाचित्र रसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध झाली आहेत.