नागपूर | पैनगंगा नदीवरील ११ बॅरेज उभारणीचे काम पूर्ण होऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. या बॅरेज परिसरातील कृषिपंपांना वीज जोडण्या देण्यासाठी आवश्यक असलेला ९५ कोटी रुपये निधी जलसंपदा विभागाने तातडीने महावितरणला उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. नागपूर येथे विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या वाशीम जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या आढावा बैकठीत राज्याचे महसूल राज्यमंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार राजेंद्र पाटणी, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. शेतीपंप वीज पुरवठा यासंदर्भातही आढावा यावेळी घेण्यात आला.