नागपूर | लोकप्रतिनिधींना विधिमंडळाचे विशेष अधिकार हे कोणालाही डावलून किंवा कोणालाही त्रास देण्यासाठी नसून ते सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपली कर्तव्य पार पाडता यावी यासाठी दिलेले अधिकार आहेत, असे प्रतिपादन विधानमंडळ विशेषाधिकार समितीच्या अध्यक्ष आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले.
विधिमंडळाचे विशेषाधिकार : सु-प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण आयुध या विषयावर महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने विधानमंडळ येथे आयोजित केलेल्या संसदीय अभ्यासवर्गात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.