वाशीम | बंजारा समाजाचे आराध्यदैवत सतगुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त राज्य शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी. अशी मागणी वसंतराव नाईक संघटनेने महसूल राज्यमंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना केली आहे.
देशात १२ कोटी तर राज्यात दीड कोटी लोकसंख्या असलेल्या बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे देशभरातील बंजारा लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येतात. ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी संत सेवालाल सप्ताह संपूर्ण राज्यात साजरा केला जातो. म्हणून १५ फेब्रुवारी या जयंती दिनानिमित्त शासकीय सुट्टी देण्यात यावी असे निवेदन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना देण्यात आले.
याप्रसंगी वसंतराव नाईक संघटनेचे महेश जाधव, नितीन राठोड, देवांवर राठोड, अनिल जाधव, संजय राठोड, सुनील राठोड, मनोहर राठोड, राजेश चव्हाण, अविनाश चव्हाण, रमेश आडे, पवन पवार, नितीन जाधव, मेघराज चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.