कोल्हापूर | पुणे बेंगलोर महामार्गावर आज पहाटे गाडीची धडक लागून एका महिलेचा या अपघात मृत्यू झालाय. भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांचे वडील यावेळी गाडी चालवत होते. त्यामुळे त्यांच्यावर कागल पोलिसांनी गुन्हे अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
रहाणे कुटुंब मुंबईहून कोल्हापूर मार्गे तारकर्लीला जाताना हा अपघात घडला आहे. यावेळी अजिंक्यचे वडील मधुकर रहाणे गाडी चालवत असताना अचानक आशाताई कांबळे या रोड ओलांडत होत्या तेव्हा त्या गोंधळून गेल्या आणि हा अपघात घडला. त्यांना स्थानिक हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र काही वेळेनंतर त्या मृत्यू पावल्या.