नागपूर | केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच इतर मागासवर्गींच्या उपवर्गीय चौकशी आयोग नेमले आहे. ह्या आयोगाचे २७ टक्के आरक्षणात विभागणीसाठी महत्त्वाची भूमिका असणार आहे. यामुळे भटक्या विमुक्त, अतिमागास, आणि बारा बलुतेदार समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे ओबीसी समाजाचे नेते आमदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.
या उपवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी आरक्षण विभागणी होवून त्यामुळे वंचित समाजाला आरक्षणाचा न्याय मिळेल. २७ टक्के आरक्षणाचे तीन भाग करण्यात येईल आणि त्यानुसार ९ टक्के भटके विमुक्त, ९ टक्के बारा बलुतेदार आणि ९ टक्के अतिमागास समाजात या आरक्षणाची विभागणी झाल्यास वंचिताना न्याय मिळेल असे आमदार हरिभाऊ राठोड यावेळी म्हणाले.