सोलापूर | येणा-या सोमवारी गुजरात निवडणूक निकाल लागणार आहे. या निवडणुकीत एक्सिट पोलनूसार भाजपाला पूर्ण बहुमताने सत्तेत येईल असे भाकीत करण्यात आले आहे. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी यांचे खंडण करीत सोमवारपर्यंत एक्सिट पोलचा आनंद घ्या असा टोला भाजपाला लगावला आहे.
काँग्रेस भवानात सरदार वल्लबभाई पटेल यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात निमित्त ते अभिवादन करण्यासाठी आले होते. गुजरात निवडणूक निकालात भाजपाला जनता सत्तेतून पायउतार करणार असल्याचे सुशीलकुमार शिंदे यावेळी म्हणाले.