नागपूर | महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे आज जागतिक ऑरेंज फेस्टीवलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. “नागपूरच्या संत्र्याला जागतिक ओळख मिळेल. संत्रा उत्पादकांच्या हाती अधिक पैसा येण्यासाठी त्यांना शाश्वत बाजारपेठेची सुध्दा निकड आहे. यामुळे तोही उद्देश साध्य होईल.” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हा महोत्सव दरवर्षी होईल आणि सरकार त्याला संपूर्ण सहकार्य करेल, असे ते म्हणाले. संत्रा संशोधनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला २ कोटी रूपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
याप्रसंगी केंदीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्यातील मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, लोकमत समूहाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते.